बांदा:
मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली-खामदेव नाका येथे मागाहून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तेथिलच अशोक नारायण परब (वय ५०) हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. हा अपघात रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला.
अशोक परब यांचे नाक्यावर हॉटेल आहे. रात्री हॉटेल बंद करून ते दुचाकीने घरी जात होते. त्यावेळी मागाहून सुसाट वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात परब यांनी रस्त्यानजिक उडी मारल्याने ते बचवलेत मात्र त्यांच्या दुचाकींचा चक्काचूर झाला. परब यांच्या कमरेला व डोक्याला मार लागल्याने त्यांना गंभीर जखमी अवस्थेत स्थानिकांनी उपचारासाठी बांदा आरोग्य केंद्रात दाखल केले. अपघातानंतर वाहन चालकाने काळोखाचा फायदा घेत पलायन केले.