नंदुरबार येथील ज्येष्ठ कवयित्री, गझलाकार, मराठी पाठ्यपुस्तक, एनएसएस साठी थीम सॉंग, तसेच शॉर्टफिल्मसाठी देखील काव्यलेखन केलेल्या सौ.सुनंदा भावसार यांची अप्रतिम गझल
फक्त वरवरचीच असते ही दिव्यांची रोषणाई
पण खुबीने झाकते ती आतली अंधारखाई
देवदासी भोगणारे केवढे नामर्द होते
जन्मभर आक्रोशणारी का,कुणा दिसली न बाई?
अंगणातच दूर तेव्हा थांबला अंधार काळा
त्यास दिसली दोन कंदिल
लावणारी वृद्ध आई
उंच ओले झाड बघुनी वीजही आकृष्ट होते
कोळसा होताच त्याचा लुप्त ती होऊन जाई
वेळ नाही पाळली तर जीव गुदमरतो जगाचा
याचसाठी पावसाला जग म्हणाले मग कसाई
©®सौ.सुनंदा सुहास भावसार