You are currently viewing वेंगुर्लेत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या विद्यार्थीनींचा सत्कार

वेंगुर्लेत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या विद्यार्थीनींचा सत्कार

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजन

वेंगुर्ले

देशाचे माजी संरक्षण मंत्री,केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवस वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

देशाचे माजी संरक्षण मंत्री,केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात केक कापून, मिठाई वाटून व विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळविलेल्या मुलींचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांचे हस्ते साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या सुरवातीला वैशिष्ट्यपूर्ण शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस निमित्त बनविण्यात आलेला केक कापून कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी नँशनल शुटींग रेंज खेळाडू सानिया आंगचेकर, दशावतार नाटकातील पहिलीच पखवाज वादक भाविका खानोलकर, राज्यस्तरीय टेनिस बाँल क्रिकेटपटू अपुर्वा परब व लिला परब यांचा व्यासपीठावरील मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, प्रांतिक सदस्य एम. के. गावडे, रयत शिक्षण संस्थेचे डायरेक्टर व सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अँथोनी डिसोजा, वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सत्यवान साटेलटर, जिल्हा बॅंक संचालिका सौ.प्रज्ञा परब, जिल्हा कार्यकारणी सदस्य नितीन कुबल, जिल्हा सरचिटणीस मकरंद परब आदींचा समावेश होता.

यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी शरद पवार हे शेतकरी, बागायतदार, मच्छीमार यासह सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे नेतृत्व आहे. खेड्या-पाड्यातील जनतेत राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा निर्माण करून महिला व युवा पिढीने संघटना मजबुत करा. असे आवाहनही केले.

यावेळी अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाप्रमुख दीपिका राणे शहर महिला अध्यक्ष सुप्रिया परब, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, महिला शहर अध्यक्षा सुप्रिया परब, शहर सचिव स्वप्नील रावळ, परबवाडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजू गवंडे, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे सरचिटणीस विकास वैद्य, सचिन शेटये, अमित म्हापणकर, बावतिस डिसोझा , माजी तालुका अध्यक्ष धर्माजी बागकर, माजी तालुका उपाध्यक्ष योगेश कुबल, प्रदीप उर्फ बबन पडवळ, प्रसाद बागकर, श्रद्धा साटेलटर, शिवाजी गावडे यांचा समावेश होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा