You are currently viewing चंद्रभागा प्रॉडक्शननिर्मित “देवाकच काळजी” चित्रपटाचे दिमाखात लाँचिंग

चंद्रभागा प्रॉडक्शननिर्मित “देवाकच काळजी” चित्रपटाचे दिमाखात लाँचिंग

कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कलामंदिरात चंद्रभागा प्रॉडक्शननिर्मित ‘देवाकच काळजी’ या चित्रपटाचे ११ डिसेंबरला मोठ्या दिमाखात लाँँचिंग करण्यात आले. या पहिल्या शोचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी कणकवलीचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, प्रकाश जाधव, प्रतिभा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

“स्थानिक कलाकारांनी एकत्र येऊन ‘देवाकच काळजी’ या चित्रपटाची केलेली निर्मिती ही बाब कौतुकास्पद” असे जिल्हा पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी म्हटले. हा चित्रपट रसिकांचा पंसतीला उतरेल आणि तुमची कला सिंधुदुर्गवासीयांना पाहता येईल. तसेच पोलीस व नागरिकांचे नाते अधिकधिक वृद्धिंगत होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कारण पोलीस हा एक समाजाचा घटक आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाचा सिनेसृष्टीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे चित्रपट निर्मितीची प्रक्रिया थांबली होती. आता कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर चित्रपटांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली असून नवनवीन विषयांवर चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला येत आहेत. “देवाकच काळजी” हा चित्रपट रसिकांचा मनावर गारुड घालेल, असा विश्‍वास दाभाडे यांनी व्यक्त केला.

शोच्या उद्घाटन प्रसंगी चित्रपटातील कलाकार सत्येंद्र जाधव, राजेंद्र कदम, उमेश तारी, रोहिणी झेंडे, शेखर गवस, मिलिंद गुरव, प्रमोद तांबे, श्रद्धा परब, विवेक वाळके, सुहास वरुणकर, संजय मालंनकर, पार्थ कोरडे, विठ्ठल गावकर, सत्यवान गावकर, सिद्धेश खटावकर व अन्य कलाकार उपस्थित होते.

श्री. दाभाडे यांनी आरंभी नटराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या चित्रपटाच्या शोचा श्रीगणेशा केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चित्रपटातील कलाकारांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रकाश जाधव, प्रतिभा जाधव या दाम्पत्याचा श्री. दाभाडे यांच्या हस्ते श्राल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास वरुणकर यांनी केले. आभार संजय मालंडकर यांनी मानले.

आज 12 डिसेंबरला दुसरा शो असून यासाठी तिकीटविक्री साठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

◆सुई-धागा कलेक्शन-कणकवली बाजारपेठ 7385454494

◆सखी ब्युटी पार्लर – कणकवली कचेरीच्या पाठीमागे 9324227035

◆हाॅटेल आमराई-मराठा मंडळ रोड कणकवली 8765321311

◆मयु’ज् मोबाईल – रामेश्वर प्लाझा कणकवली ,सारस्वत बॅंक शेजारी कणकवली 8380828772.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा