You are currently viewing शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात

शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात

सावंतवाडीत खोखो-कबड्डीवर चर्चासत्र

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा खोखो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी 10 ते 12 या वेळेत हॉटेल मँगो- 2, मोती तलाव समोर, सावंतवाडी येथे ” सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी व खोखो खेळाची सद्यस्थिती” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आल. चर्चासत्रात जिल्ह्यातील ज्येष्ठ मातब्बर राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू सहभागी झाले होते. निवडक स्वयंसेवी संस्था तसेच विविध स्पर्धा आयोजित करणारी अधिकृत क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं.

गेली अनेक वर्ष या दोन्ही खेळात होत असलेली पिछेहाट याबाबत गंभीर चर्चा झाली. पुन्हा एकदा दोन्ही देशी खेळांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी विशेष आराखड्याचे नियोजन सुद्धा करण्यात आले.दरम्यान, केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा खोखो असोसिएशन सचिव नंदन वेंगुर्लेकर, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, माजी उपनगराध्यक्ष उमा वारंग, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, जावेद शेख, संतोष जोईल, प्रकाश बिद्रे, विकि तोरसकर,  दीनानाथ बांदेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा