You are currently viewing जिल्हा प्रशासनाकडे कोरोनासाठी वापरली जाणारी रेमडिसिव्हीर ची ४५० इंजेक्शनसह रुग्णांसाठी १२०० बेडस् उपलब्ध….

जिल्हा प्रशासनाकडे कोरोनासाठी वापरली जाणारी रेमडिसिव्हीर ची ४५० इंजेक्शनसह रुग्णांसाठी १२०० बेडस् उपलब्ध….

जिल्ह्याधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी

जिल्हात११०६ कोरोना रुग्ण असून त्यातील होम आयसोलेशन मधे ५९९ कोरोना रुग्ण अाहेत. कोरोनासाठी वापरण्यात येत असलेली रेम्डीसिव्हिरची ४५० ईजेक्शन उपलब्ध आहेत. आता जिल्हात खाजगी चार हाॅस्पिटल सह सरकारी हाॅस्पिटलचे मिळून एकुण १२०० बेड्स कोरोणा रुग्णासाठी उपलब्ध आहेत. खाजगी हाॅस्पटलचेही दर निश्चित आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली.

सिंधूदूर्गात आतापर्यंत कोरोणामुळे ६९ मृत्यू झाले आहेत कोरोणा रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेण्यास अथवा त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास प्रशासनासमोर अनेक अडचणी आहेत नातेवाईक किंवा नागरिक मृतदेह ताब्यात घेण्यास तयार असतील त्यांच्या ताब्यात हे मृतदेह देण्यात येत आहेत तसेच त्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. तर कोरोना मृतदेह त्या गावात पोहचेपर्यन्त जास्त धोकादायक असल्याने बहुतांशी मृतदेहावर सिंधुनगरी येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. येथील नागरिकांच्या तक्रारीवरुन नवीन स्मशानभुमीही निर्माण करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे अशी माहीती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली.

यावेळी मुख्य कार्य अधीकारी हेमंत वसेकर जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ धनंजय चाकुरकर ,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ महेश खलिपे, जिल्हा माहिती अधिकारी हेमंत चव्हाण उपस्थीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा