You are currently viewing नग्नता*(Nudity)

नग्नता*(Nudity)

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या, बियोंड सेक्स या प्रख्यात कादंबरीच्या लेखिका सोनल गोडबोले यांचा लेख

नग्नता ही आपल्या विचारात असते. काल मी एका ठिकाणी गेले होते तिथे पदर बाइ होती. त्या स्त्री ला मी गेले अनेक वर्षे पहातेय तिचे आचार विचार तेच कशातही काडीचा बदल नाही. उजव्या खांद्यावरचा पदर रात्री झोपतानासुध्दा तिने कधी बाजुला केला नसावा. या सारखे असंखय स्त्री पुरूष आहेत ज्यानी स्वतःला कपड्याशिवाय कधी न्याहाळलच नसेल किवा स्वतःचं शरीरही पाहिलं नसेल. जन्माला येताना नग्न जन्माला येतो . खजुराहो येथे प्राचीन काळी नग्न स्त्री पुरूष यांची लेणी मंदिराबाहेर तुम्हाला आजही पहायला दिसतात याचा अर्थ आपल्या पुर्वजाना काय सांगायचा असेल ही जाणुन घ्यावे.
एका घरात लग्नाला दहा वर्षे झाली तरी दिवस जात नाहीत अशा एका स्त्रीचे म्हणणे होते. तिने ते माझ्याकडे व्यक्त केले तिला म्हटलं तुम्ही दोघे किती वेळा एकत्र असता त्यावर तिने जे सांगितले ते भयानक होते. आम्ही महिन्यातुन एकदा सेक्स करतो तेही वेगळ्या खोलीतजाऊन आणि मग आंघोळ करुन घरात येतो.. २०२१ मधे आहोत आणि मला हे ऐकायला लागतेय याची लाज वाटली. अशा परिस्थितीत ते आईबाबा कसे होणार आणि मी तिला काय सांगु.. संभोग वाईट नाही तर उच्चतम पराकोटीचा तो आनंद असतो . आपल्याकडे चुकीच्या पध्दतीने हे कुटुंबात जात असल्याने त्याला वाईट वळण दिलं गेलय. सगळ्या गोष्टी अंधारात करणं आणि सगळं पदराखाली झाकुन ठेव् णं याने कुतुहल निर्माण होतं आणि ते उघडं करायला माणसं नको त्या थराला जाताना दिसतात. माझा मित्र म्हणाला आमच्याकडे नवरात्रीचा ९ दिवस उपवास असतो म्हणुन ९ दिवस सेक्स करत नाही.. किती बुरसटलेल्या विचारसरणीत आपण जगतो ना.. त्यातलं सौंदर्य पहा. आरशासमोर राहुन स्वतःला न्याहाळलं तर तुम्ही नन्ग दिसणार नाही तर अजुन सुंदर दिसाल.. पोट आणि कंबर वाढलेय का ती कमी करायची असेल तर काय करता येइल पहा.. आरशासमोर आपल्या शरीराची आपल्यालाच लाज वाटली तर दुसऱ्यालाही वाटणार.. म्हणजेच व्यायाम आणि योग्य वेळी योग्य आहार.. सोनल क्रिएशन्स या माझ्या युटुब चॅनलवर सेक्सरसाईज व्हीडीओ जरुर पहा ..

सोनल गोडबोले
लेखिका.. बियॉन्ड सेक्स कादंबरी
8380087262

प्रतिक्रिया व्यक्त करा