You are currently viewing डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ अध्यासनाचे उद्‌घाटन प्रा. दामोदर मोरे यांच्या हस्ते संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ अध्यासनाचे उद्‌घाटन प्रा. दामोदर मोरे यांच्या हस्ते संपन्न

ठाणे प्रतिनिधी

यश हे दिसत असते परंतु त्या यशा मागचा त्याग कधीच दिसत नसतो,भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाची तहान लागली होती, ज्ञानाच्या क्षेत्रातील अजिंक्य वीर म्हणजे भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आहेत असे प्रतिपादन जेष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि मराठी – हिंदी साहित्यिक प्रा . दामोदर मोरे यांनी बदलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ अध्यासनाच्या उद्‌घाटन समयी केले .


महाराष्ट्र राज्याच्या भूषणात भर टाकणारे ग्रंथालय बदलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे . या ग्रंथालयाचा उद्‌घाटन सोहळा नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला . या समयी उपस्थिताना संबोधित करतांना प्रा . दामोदर मोरे पुढे म्हणाले की, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी सलग
अठरा-अठरा तास अभ्यास करुन वंचितांची शेकडो शतकांची तहान भागविली आहे, आपल्या प्रज्ञेने त्यांनी कल्याणकारी भारतीय घटना लिहिली, म्हणूनच त्यांना ज्ञानाच्या क्षेत्रातील अजिंक्य वीर आणि विद्यापीठाच्या क्षेत्रातील विविध पदव्या मिळविणारे ‘अलेक्झांडर ‘ म्हटले जाते .


बदलापूर येथील ‘साहित्य गौरव ग्रंथालयाने’ आयोजित केलेल्या ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ अध्यासनाचे ‘ उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष पदावरुन बोलतांना प्रा . दामोदर मोरे यांनी डॉ. आंबेडकर अध्यासन निर्मिती आणि
ग्रंथालयासाठी विनामूल्य इमारत देणारे नगर सेवक कॅप्टन आशिष दामले आणि ग्रंथालयाचे विश्वस्त शाम जोशी यांच्या सामाजिक बांधिलकीचा त्यांनी आपल्या भाषणात गौरव केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथप्रेमी , ज्ञान प्रेमी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर ग्रंथालयाने निर्माण केलेली एक सुंदर अशी डाकुमेंटरी चल चित्रकित दाखविण्यात आली. या चित्र फिती मध्ये नगरसेवक आशिष दामले, प्रा. दामोदर मोरे, रमेश शिंदे, शाम जोशी, अर्चना कर्णिक यांनी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश झोत टाकण्यात आला आहे. या समयी डॉ . बाबासाहेब आंबेडकर विषयक मौलिक साहित्याचे जतन करणारे रमेश शिंदे तसेच आंबेडकरी डिरेक्टरीचे काम हाती घेतलेले कल्याणचे देवचंद अंबादे
यांचा प्रत्येकी अकरा हजार रुपये, तसेच स.ग.मालशे यांचा शाम जोशी यांनी संपादित
केलेला ग्रंथ आणि शाल देऊन नगर सेवक आशिष दामले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . याच कार्यक्रमात ग्रंथालयाचे विश्वस्त शाम जोशी यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ अध्यासनाचे ‘ अध्यक्ष म्हणून प्रा . दामोदर मोरे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. ग्रंथपाल अर्चना कर्णिक, कवी शिवा इंगोले, लेखक दुनबळे, विठ्ठल मोरे, स्वप्निल सोनवणे, तुकेश मोटघरे, जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे, पत्रकार सुनील शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाम जोशी यांनी केले . कार्यक्रमास महिलाही वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता .

प्रतिक्रिया व्यक्त करा