You are currently viewing साधना

साधना

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री परवीन कौसर यांची काव्यरचना

अलवार तुझ्या स्पर्शाची
जाणिव आज झाली
रखरखत्या उन्हात देखील
अंगावर मोहर उमटली

साजशृंगार करण्याची
हौस रुंजी घालते मनी
हळूच डोकावून पाहू वाटे
सजणाच्या गुलाबी नयनी

तुझ्यासाठी अजूनही
जपले आहे मी स्वतःला
होईल का सफल साधना
प्रश्न पडे या वेड्या मनाला

दाटलेले धुके पाहताना
डोळ्यात अश्रू उभे राहिले
गुलाबी थंडीच्या गारव्यात
मनाचे अंगण ओलावले

चांदण्यांच्या पावलांनी
घराचे अंगण सजवायचे
सुखाचा संसार मांडायचा
होते स्वप्न आपले दोघांचे

प्रेमाचा बहार येण्याआधीच
पानगळ सुरू झाली
मांडलेला डाव अर्ध्यावर
सोडून प्रित अधुरीच राहीली

✍🏻 परवीन कौसर
बेंगलोर….

प्रतिक्रिया व्यक्त करा