You are currently viewing स्थानिक खाकी वर्दीमुळे सुरू असलेले जत्रेतील जुगार संवाद मिडीयामुळे बंद

स्थानिक खाकी वर्दीमुळे सुरू असलेले जत्रेतील जुगार संवाद मिडीयामुळे बंद

रात्री १० नंतरही संवाद मिडिया बातमी देत असल्याने पहाटे जुगार लावण्याचा झाला निर्णय

जिल्ह्यात जत्रोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली असून जत्रेतील जुगार हा मोठाच चर्चेचा विषय बनला आहे. जिल्ह्यात बंद असलेले जुगार स्थानिक खाकी वर्दीच्या आशीर्वादाने सुरू झाले होते. रात्री दहा नंतर सुरू होणाऱ्या जुगाराची इत्यंभूत माहिती संवाद मिडियाकडे येताच संवाद मिडिया सविस्तर बातमी प्रसारित करून जत्रेतील जुगारांवर टाच आणत असतो. संवाद मीडियाच्या बातमीची दखल खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेत जत्रेतील जुगारांवर बंदी घातली आहे.
संवाद मिडीयाला रात्री १० नंतर सुरू झालेल्या जुगारांची बातमी मिळत असल्याने जुगार बंद करावे लागत असल्याने आता जत्रेतील जुगार पहाटे सुरू करण्याचा आजच्या जुगाऱ्यांच्या बैठकीत निर्णय झाला असून त्यांना स्थानिक खाकी वर्दीने देखील परवानगी दिली आहे. बांदा कोंडुरा रस्त्यावरील आडलोस येथील जत्रोत्सवात आज पहाटे जुगार सुरू करणार असल्याची खात्रीलायक बातमी संवाद मिडियाकडे प्राप्त झाली आहे. संवाद मीडिया सविस्तर बातमी देत असल्याने जुगारी संवाद मिडीयाला बातमी कोण पुरवतो याचा शोध घेत आहेत.
आडलोस येथील जत्रोत्सवात पिवळे तांबडे केस आणि गळ्यात सोन्याची चैन घालणाऱ्या जुगाऱ्याने बैठक ठरविली असल्याची माहिती समोर येत आहे. संवाद मीडियाची बातमी आली की जत्रोत्सवात वरिष्ठ अधिकारी पथक पाठवतात आणि पोलीस पोचले की जुगार खेळणाऱ्यांची आणि मोठ्या हौशेने जुगार पाहणाऱ्यांची तारांबळ उडते….भीतीपोटी उडालेल्या गोंधळात धावपळीत काहीजण जखमी होतात…कुडाळ तालुक्यातील घावनळे जत्रोत्सवात देखील सुरू असणाऱ्या जुगारांवर पहाटे एलसीबी ने धाड टाकताच असाच प्रकार घडला होता. त्यामुळे जुगाऱ्यांसहित स्थानिक खाकी वर्दीने देखील संवाद मिडियाच्या बातमीचा धसका घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा