कणकवली
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल संस्थेच्या वतीने १९ डिसेंबर रोजी वधूवरांसाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यामध्ये दिव्यांग, विधुर, घटस्फोटीत व इतर सर्व समाजातील वधूवरांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक वधूवरांनी आपल्या बायोडाटा, फोटो, सह संस्थेच्या कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. स्थळ – रुपेश बांदेकर मेडिकल शेजारी, बाजारपेठ कसाल, मो. ९७६५९७९४५०संपर्क करा.