You are currently viewing कोकणातील विद्यार्थ्यांना “तिमिरातुनी तेजाकडे” नेण्याचा ध्यास

कोकणातील विद्यार्थ्यांना “तिमिरातुनी तेजाकडे” नेण्याचा ध्यास

निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला (रत्नागिरी + सिंधुदुर्ग जिल्हा)

सात शैक्षणिक अर्हता असणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपूत्र व मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे श्री. सत्यवान यशवंत रेडकर, निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा १८-२४ डिसेंबर २०२१ च्या दरम्यान खाली नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला घेणार आहेत. सदर व्याख्यानांसाठी कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नाही. श्री. रेडकर सर व्याख्यानासाठी कोणतेही मानधन घेत नाहीत.

१ रत्नागिरी शहर- शनिवार, दिनांक १८.१२.२०२१, आर.बी.शिर्के हायस्कूल, माळनाका, रत्नागिरी (सकाळीः ९.०० वाजता), सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय, एस.टी स्टॅड समोर, रत्नागिरी (दुपारीः २.०० वाजता)

२ राजापूर तालुका- रविवार, दिनांक १९.१२.२०२१, वि.सी गुर्जर विद्यामंदिर व ज्युनि.कॉलेज ऑफ आर्टस एण्ड कॉमर्स, कशेळी, (सकाळीः ९.०० वाजता), श्री. महाकाली इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आडिवरे (दुपारीः १.०० वाजता)

३ सोमवार, दिनांक २०.१२.२०२१, युवक विकास मंडळ संचालित कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, भालावली, (सकाळीः ९.०० वाजता), नाटे नगर विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, नाटे (दुपारीः १.०० वाजता)

४ मंगळवार, दिनांक २१.१२.२०२१, न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय, जैतापूर, (सकाळीः ९.०० वाजता), साने गुरूजी विद्यामंदिर आणि प्रकाश भिकाजीराव चव्हाण आर्टस् व कॉमर्स (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय, जानशी (दुपारीः १.०० वाजता)

५ बुधवार, दिनांक २२.१२.२०२१, शेठ म.ग. हायस्कूल देवगड (सकाळीः ८.०० वाजता), पूर्ण प्राथमिक शाळा, सावडाव नं. १, कणकवली (दुपारीः १२.०० वाजता)

६ गुरूवार, दिनांक २३.१२.२०२१, आंबोली पब्लिक स्कूल (सकाळीः ९.०० वाजता), श्री. शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये (दुपारीः १.०० वाजता)

७ शुक्रवार, दिनांक २४.१२.२०२१, महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल, सातार्डा (सकाळीः ९.०० वाजता), बांदा ग्रामपंचायत सभागृह, खेमराज मेमोरियल इंग्लिश शाळेच्या बाजुला (दुपारीः १.०० वाजता)

“शासकीय कर्मचा-यांचे गाव” घडविण्यासाठी ही शैक्षणिक चळवळ आहे, जास्तीत जास्त रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या निःशुल्क मार्गदर्शन व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन तिमिरातुनी तेजाकडे या नोंदणीकृत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, श्री. सचिन यशवंत रेडकर (मो. ९७६८७३८५५४ / ९९६९६५७८२०) यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा