कॅन्सर रुग्णांची होणार मोफत पूर्व तपासणी…
सावंतवाडी
येथील रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या माध्यमातून कॅन्सर रूग्णांच्या पूर्व तपासणीसाठी ११ तारखेला सावंतवाडीत “होप एक्सप्रेस” दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राजवाडया जवळील फिजिओथेरपी सेंटर मध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी इच्छुक रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष साई हवालदार आणि सुधीर नाईक यांनी केले आहे.अधिक माहीतीसाठी:-
श्रिया नाईक ९४०४३९६०२६,
साई हवालदार ८००७५३७३७०,
सत्यजित धारणकर ९४२३३०४४४८
या नंबरवर संपर्क साधावा.