आता ४७ उमेदवार रिंगणात; न्यायालयाच्या आदेशामुळे १३ जागांवरच निवडणूक…
कुडाळ
येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी आज झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता १७ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान ओबीसी प्रवर्गातील निवडणुका स्थगित करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने आता फक्त १३ जागांवरीलच निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली