You are currently viewing सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनाची बातमी संपूर्ण देशासाठी अत्यंत क्लेशदायक

सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनाची बातमी संपूर्ण देशासाठी अत्यंत क्लेशदायक

 

देश अनेक समस्यांतून कष्टप्रद वाट काढत असताना अशा अलौकिक व्यक्तीमत्वाचं आपल्यात नसणं हे शोचनीयच आहे…

२०१९ साली स्वातंत्र्यदिनी, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांनी चिफ अॉफ डीफेन्स स्टाफ (CDS) या नव्या पदाची घोषणा केली. बिपीन रावत तिन्ही संरक्षण दलांचे पहिले सीडीएस जनरल म्हणून नियुक्त झाले.

लष्करी सेवा बजावताना त्यांनी जिगरबाजपणे, अनेक मोठ्या आवाहनांचा लढा जिंकला आहे. उत्तरेकडे लष्कराची फेरबांधणी करण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. वाढता दहशतवाद, छुपी युद्धं, ईशान्येकडील संघर्ष.. या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती ही महत्वपूर्ण होती. अशांतता असलेल्या प्रदेशात काम करण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव होता.

पाकीस्तानला लागून असलेली नियंत्रण रेषा, भारत चीन सीमा रेषा व ईशान्येकडील राज्यांत त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती.

गेल्या तीस वर्षात त्यांनी लष्कराची महत्वपूर्ण पदे भूषविली. समतोल पद्धतीनं सैन्याचं संचलन केलं. सुरक्षा विषयक मोहिमा यशस्वीपणे राबवल्या. नागरिकांशी सहज संवाद साधण्यात त्यांचा हातखंडा होता. ११ गोरख रायफल्सच्या पाचव्या तुकडीतून डिसेंबर १९७८ पासून राष्ट्राच्या लष्करी सेवेस त्यांची सुरवात झाली.

कॉंगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेचे बहुराष्ट्रीय ब्रिगेडचे नेतृत्व केले.

“कोरोना महामारीचे जैविक युद्धात परिवर्तन होऊ शकते. अशावेळी सर्व देशांनी करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे “असे भाष्य त्यांनी नुकतेच केले होते…

आज ते आपल्यात नाहीत..

एक कणखर लष्करी नेतृत्व हरपलं..

एक सच्चा देशप्रेमी सैनिक आपण गमावला..

देशासाठी ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे..

या क्षणी मात्र आपण फक्त त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करु शकतो…

एका बलशाली नेतृत्वास अखेरचा प्रणाम..!!

 

सौ. राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा