You are currently viewing देवी पावणाई मंदिरात माडखोल धरण लाभ क्षेत्रातिल शेतकऱ्यांची सिंचन हंगामातिल बैठक संपन्न

देवी पावणाई मंदिरात माडखोल धरण लाभ क्षेत्रातिल शेतकऱ्यांची सिंचन हंगामातिल बैठक संपन्न

सावंतवाडी

श्री देवी पावणाई मंदिरात माडखोल धरण लाभ क्षेत्रातिल शेतकऱ्यांची सिंचन हंगामातिल बैठक कार्यकारी अभियंता श्रीमंगले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी अकरा वाजता संपन्न झाली.  या बैठकीत 25 डिसेंबर 2021 पासुन शेतकऱ्यांना पाणी सोडण्याचे कळविण्यात आले,  तसेच प्रस्थापित विकास कामे लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन श्रीमंगले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.  या बैठकीत उजवा कालवा चे काम करण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी पाहणी करण्याचे ठरले.  कार्यकारी अभियंता श्रीमंगले, शाखाधिकारी नाईक, माडखोल ग्रामस्थ कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष माजी पाणी वापर संस्था अध्यक्ष जॅकी डिसोजा, उपसरपंच शिवाजी परब, तंटामुक्ती अध्यक्ष संजय लाड, शेतकरी बाबी केसरकर, रोहित गोताड, अरविंद गावडे, जानु तेली यांच्यासह पाहणी करण्यात आली. यावेळी जॅकी डिसोजा यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा श्रीमंगले यांच्याकडे मांडल्या. त्यावेळीच श्रीमंगले  यांनी माडखोल विकास कामांवर विशेष लक्ष केंद्रित करून लवकरात लवकरच काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − three =