वैभववाडी
वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १३ जागांसाठी एकूण ५० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. १७ जागांपैकी १३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
प्रभाग निहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे –
प्रभाग क्रमांक १ – स्नेहलता सदाशिव चोरगे भाजपा, श्रद्धा रोहित रावराणे शिवसेना, मीना नामदेव बोडके राष्ट्रीय काँग्रेस,
प्रभाग क्रमांक २- नेहा दीपक माईणकर भाजपा, साक्षी संतोष माईणकर भाजपा, रेखा सुरेश निकम शिवसेना,
प्रभाग क्रमांक ४ – प्रिया भानुदास तावडे भाजपा, अक्षता अरुण जैतापकर अपक्ष, सुलोचना रोहिदास पवार राष्ट्रवादी काँग्रेस, सुनिता रवींद्र चव्हाण शिवसेना,
प्रभाग क्रमांक ६- राजन वसंत तांबे भाजपा, सुप्रिया राजन तांबे भाजपा, रवींद्र श्रीधर तांबे शिवसेना,
प्रभाग क्रमांक ७ – भालचंद्र मारुती रावराणे भाजपा, प्रदीप प्रकाश रावराणे शिवसेना, सुभाष अनाजी रावराणे शिवसेना, सचिन तावडे मनसे, समाधान मारुती रावराणे भाजपा, चित्रसेन धर्माजी होळकर राष्ट्रवादी काँग्रेस,
प्रभाग क्रमांक ८ – मंगेश विठोबा नाधवडेकर राष्ट्रीय काँग्रेस, रवींद्र गुलाबराव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस, संताजी अरविंद रावराणे अपक्ष, रोहन जयेंद्र रावराणे अपक्ष, तुषार मोहन चिले मनसे, संजय सखाराम चव्हाण शिवसेना,
प्रभाग क्रमांक ९ – तन्वी शरद तांबे शिवसेना, सुप्रिया राजन तांबे भाजपा,
प्रभाग क्रमांक १० – सुंदरी रामचंद्र निकम भाजपा, दीपक सदाशिव गजोबार शिवसेना, सुप्रिया रणजीत निकम भाजपा, यशवंत वासुदेव प्रभुलकर काँग्रेस,
प्रभाग क्रमांक ११- यामिनी यशवंत वळवी भाजपा, जयश्री विश्वनाथ बहीरम शिवसेना,
प्रभाग क्रमांक १२ – प्रथमेश यशवंत रावराणे शिवसेना, विनायक सज्जन रावराणे अपक्ष, सज्जन विनायक रावराणे भाजपा, विवेक सज्जन रावराणे भाजपा, सुधाकर बळवंत रावराणे काँग्रेस, मनोज दत्ताराम सावंत शिवसेना,
प्रभाग क्रमांक १३ – शिवाजी सखाराम राणे शिवसेना, विशाल विश्राम राणे शिवसेना, संजय दिगंबर सावंत भाजपा, संतोष दत्ताराम कुडाळकर भाजपा,
प्रभाग क्रमांक १४- रिया रणजीत तावडे शिवसेना, दर्शना संतोष पवार शिवसेना, श्रावणी श्रीकांत तांबे भाजपा,
प्रभाग क्रमांक १७- दीक्षा दिगंबर घोडके अपक्ष, सानिका सुनील रावराणे शिवसेना, शुभांगी विलास माळकर शिवसेना, सानिका समाधान रावराणे भाजपा, या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरज कांबळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ही निवडणूक जाहीर झाली होती. परंतु कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसीच्या चार प्रभागाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. भाजपकडून एकूण १८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सेनेकडून १७, राष्ट्रीय काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३, अपक्ष ५, मनसे २ अर्ज दाखल करण्यात आले आहे.