कुडाळ :
कुडाळच्या बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या शैक्षणिक उन्नती,शैक्षणिक कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकी ही जोपासताना दिसतात . त्याचाच एक भाग म्हणजेच अणाव मयेकरवाडी येथील जीवन संजीवन सेवा ट्रस्ट च्या आनंदाश्रय वृद्धाश्रमाला या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी संस्थाचालक उमेश गाळवणकर प्राचार्या मीना जोशी, उपप्राचार्य कल्पना भंडारी, वर्गशिक्षक प्रथमेश हरमलकर ,एच. आर. ओ.तथा मानसशासत्राच्या अध्यापिका पियुषा प्रभूतेंडोलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच भेट दिली. पूर्ण दिवसभर आश्रमातील वृद्धांची शुश्रूषा करत वृद्धांच्या आरोग्याची पूर्ण तपासणी केली. आरोग्याच्या विविध टिप्स दिल्या. योगा, मनोरंजनात्मक खेळ, कार्यक्रम याद्वारे त्यांची जगण्याची इच्छाशक्ती अधिकच प्रज्वलित करून त्यांना एक आनंदाचा नजराणाच बहाल केला. याबद्दल आनंदआश्रय चे संचालक बबन परब आणि सहकारी यांनी समाधान व्यक्त केले आणि विशेष म्हणजे या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शुश्रुषेने भारावून जाऊन त्या वृद्धानी पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले आणि ते सुद्धा बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने पाळण्यात आले व पुन्हा त्यांची सेवा शुश्रुषा करत त्यांना एकाकीपणातून व त्यांच्या व्यथातून बाहेर काढण्याचा स्तुत्य उपक्रम घेत त्यांना जगण्याचे बळ दिले. याबद्दल आश्रमाचे संचालक व वृद्ध यांनी अत्यंत मनापासून धन्यवाद देत समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.