You are currently viewing ” ती “

” ती “

कवितांजली व सदाबहार काव्यांजली ग्रुपच्या सदस्या कवयित्री सौ.स्वाती गोखले यांची काव्यरचना

कित्ती जीव लावत असते ती घरातल्या प्रत्येकासाठी !
मनातला प्रकाश लख्ख उजळून जातो तिच्या घरादारासाठी !

कष्टाने सा-यांसाठी ती पेरत असते आनंदाचे क्षण!
तिच्याही वाट्याला यावेत कधीतरी त्यातील काही कण !

कुठेतरी, कुणीतरी नक्की मागत असतील दुवा तिच्यासाठी !
देवाला देखील वाटत असेल घ्यावी दखल तिच्यासाठी !

देवाकडे ती करते मनोमन प्रार्थना सर्वांसाठी !
सुखी ठेव देवा सर्वांना त्यांच्याच भल्यासाठी !

तिच्या मनाचा हळवा कोपरा खरंच सुखावून जातो!
आत आत कुठेतरी तिला आनंद देऊन जातो !!

सौ. स्वाती गोखले.
पुणे.
९०४९६१५८२५

प्रतिक्रिया व्यक्त करा