You are currently viewing सायकल फेरीद्वारे केली बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी अपंगदिन जनजागृती

सायकल फेरीद्वारे केली बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी अपंगदिन जनजागृती

बांदा

जागतिक अपंग सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी सायकलद्वारे प्रभातफेरी काढून जनजागृती केली.

‘सर्वांचा निर्धार,अपंगाचा स्विकार,’ ‘अपंगाचा सन्मान, हाच आमचा अभिमान,’ ‘अपंगाचे शिक्षण ,प्रगतीचे लक्षण ‘अशा प्रकारच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी सायकल वरून काढलेली रॅली लक्षवेधी ठरली. या सप्ताहाच्या निमित्ताने बांदा केंद्रशाळेत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत धीरज सतिश पटेल याने प्रथम क्रमांक मिळवला तर ललिता राजन देसाई हिने द्वितीय , प्रज्वल विष्णू लमाणी तृतीय तर हर्षाली अनिल म्हाडगुत हिने चतुर्थ क्रमांक मिळवला. या यशस्वी विद्यार्थ्यांना उमेद फौंडेशनच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख संदीप गवस मुख्याध्यापक सरोज नाईक व सर्व शिक्षक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा