सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र मेरोटाईम बोडामार्फत प्रचलित नियमानुसार वाळू वाहतूक करणाऱ्या होड्यांची नोंदणी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. तरी जिल्हयातील खाडीपात्रांमध्ये नोंदणीकृत नसलेल्या होड्याची नोंदणी करुन घेणेसाठी संबंधित होंडी मालकांने आवश्यकत्या कागदपत्रांसह बंदर निरीक्षक, सहाय्यक बंदर निरीक्षक महाराष्ट्र मेरोटाईम बोर्ड यांचे कार्यालयांशी संपर्क साधुन होड्यांची नोंदणी करुन घ्यावयाची आहे. नोंदणी झालेनंतर होडीच्या दर्शनी भागावर नोकेचा नोंदणी क्रमांक, नौकेचे नांव व होंडी मालकांचे नांव दिसेल अशा प्रकारे नोंद करावी. सिंधुदुर्ग जिल्हयामधील असणाऱ्या सर्व खाडीपात्रांमध्ये पाहणीचे दरम्यान नोंदणीकृत नसलेली होडी खाडीपात्रामध्ये आढळून आल्यास प्रचलीत कायद्यांनुसार संबंधीतांवर कारवई करयात येणार असल्याचे माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, वेंगुर्ला यांनी कळविले आहे.