You are currently viewing मालवण पालिकेत भाजपचा विजय निश्चित

मालवण पालिकेत भाजपचा विजय निश्चित

भाजप युवामोर्चा मालवण शहर अध्यक्षपदी ललित चव्हाण यांची निवड

मालवण :

भाजप युवामोर्चा मालवण शहर अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या ललित चव्हाण यांचे अभिनंदन भाजप नेते निलेश राणे यांनी मालवण येथे आयोजित कार्यक्रमात केले. जिल्ह्याचा, कोकणचा विकास राणे साहेबांच्या माध्यमातून झाला. राणे साहेब ही आमची ओळख आहे. मात्र मालवण आणि राणे साहेबांचे वेगळे नाते आहे. साहेबांच्या वाटचालीत येथील अनेक जेष्ठ कार्यकर्ते यांचे मोठे योगदान आहे. याच पदाधिकाऱ्यांनी पक्षाला यश मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. आता मालवण शहारात सुदेश आचरेकर, दीपक पाटकर व टीम चांगले काम करत आहे. आगामी पालिका निवडणुकीत भाजपला शंभर टक्के यश मिळणारच. असाही विश्वास भाजप नेते निलेश राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा चिटणीस विजू केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, नगरसेवक दीपक पाटकर, गटनेते गणेश कुशे, नगरसेवक जगदिश गावकर, नगरसेविका पूजा करलकर, नगरसेविका ममता वराडकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब, तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, बाळू कुबल, आबा हडकर, अजय शिंदे, राजू बिडये, मंदार लुडबे, चारूशीला आचरेकर यासह अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =