You are currently viewing एलईडी टिव्हीवर चक्क वॉशिंग मशीन भेट, सावंतवाडीच्या “म्युझिक कॉर्नर” ची अनोखी ऑफर…

एलईडी टिव्हीवर चक्क वॉशिंग मशीन भेट, सावंतवाडीच्या “म्युझिक कॉर्नर” ची अनोखी ऑफर…

शहरात दुसरे सुसज्ज दालन सुरू; स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुर्हूर्तावर उद्घाटन, अन्य वस्तूवरही भरघोस सुट…

सावंतवाडी

गेली अनेक वर्षे दर्जेदार सेवा देणारे सावंतवाडीचे “म्युझिक कॉर्नर” आता शहरात दुसरे सुसज्ज असे दालन सुरू करीत आहे. या दालनाचे उद्घाटन १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर होत आहे. या पार्श्वभूमीवर “हर घर वॉशिंग मशीन” असा संकल्प सोडुन कमी खर्चात “स्मार्ट एल. र्ई. डी. टिव्ही घेणार्‍या ग्राहकांना वॉशिंग मशीन मोफत दिली जाणार आहे. त्याच बरोबर अन्य खरेदीवर आकर्षक भेटवस्तू देण्याचा त्यांचा मानस आहे. या दालनात एसी, कुलर, वॉशिंग मशीन, सर्व प्रकारच्या टीव्ही, फ्रिज, ओव्हन, साऊंड सिस्टिम, डिश टीव्ही सेटअप तसेच विविध इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे उपलब्ध होणार आहेत. तरी जास्तीत-जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, तसेच शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन दालनाचे प्रमुख राजन हावळ आणि रितेश हावळ यांनी केले आहे.

येथील जय प्रकाश चौकात “म्युझिक कॉर्नर ॲण्ड मोबाईल शॉपी” गेली अनेक वर्ष ग्राहकांना विश्वसनीय सेवा देत आहे. हिंदू सणांचे औचित्य साधून वर्षभरात अनेक ऑफरचा लाभ येथून ग्राहकांना मिळतो. विशेष म्हणजे स्मार्टफोन खरेदीवर हमखास भेट वस्तु ही या दालनाची खासियत आहे. त्यामुळे अल्पावधीतच असंख्य ग्राहकांना त्यांनी आपल्याकडे खेचून घेतले आहे. तर सोबतच एसी, कुलर, वॉशिंग मशीन, सर्व प्रकारच्या टीव्ही, फ्रिज, ओव्हन, साऊंड सिस्टिम, डिश टीव्ही सेटअप तसेच विविध इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुद्धा त्यांनी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले. मात्र जागे अभावी ती डिस्प्ले होऊ शकत नसल्यामुळे याच दालनाचा विस्तार त्यांनी भव्य शोरूमच्या रूपात केला आहे. त्यामुळे नव्याने सुरू होणाऱ्या या शाखेत ग्राहकांना कुठली वस्तू खरेदी करताना ती पूर्णतः पाहून घेता येणार आहे. परिणामी ही सेवा ग्राहकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास हावळ बंधूंनी व्यक्त केला. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या दालनाचा शुभारंभ होत आहे. तसेच देशात सुरू असलेले “हर घर तिरंगा” अभियान डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य ग्राहकांच्या घरात “वॉशिंग मशीन” पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी “हर घर वॉशिंग मशीन” जाहीर केली आहे. या सेवेचा लाभ स्मार्ट एल. ई. डी टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे. स्मार्ट एल. ई. डी टीव्ही खरेदीवर वॉशिंग मशीन ग्राहकांना बिलकुल मोफत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही वस्तू वॉरंटी सहित ग्राहकांना मिळणार आहेत. तसेच इतर इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीवर सुद्धा आकर्षक भेटवस्तू आणि सूट दिली जाणार आहे. तर ही सेवा मर्यादित कालावधीसाठी असल्याने जास्तीत-जास्त ग्राहकांनी याचा त्वरित लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी 7719918722 या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन हावळ बंधूंनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा