You are currently viewing इयत्ता 5वी ते 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 रोजी

इयत्ता 5वी ते 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 रोजी

सिंधुदुर्गनगरी 

सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

         इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन परीक्षामध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता 8वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यामधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती  परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर दिनाक 1 डिसेंबर 2021  पासून ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. परिक्षा 20 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहे.

       जिल्हयातील जास्तीत -जास्त शाळांतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी प्रविष्ठ व्हावे व आवेदन पत्र भरण्यासाठी आपल्या शाळेच्य मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. मुश्ताक शेख शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − seven =