You are currently viewing जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आ. वैभव नाईक,सतीश सावंत यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल

जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आ. वैभव नाईक,सतीश सावंत यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज जिल्हाबँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीकडून सतीश सावंत,सुशांत नाईक, विद्याप्रसाद बांदेकर, व्हिक्टर डांटस, दिगंबर पाटील, अनारोजी लोबो, नीता राणे, आत्माराम ओटवणेकर, विनोद मर्गज, सुरेश दळवी, एम. के. गावडे, बाबा आंगणे, मेघनाथ धुरी, मनीष पारकर, विकास सावंत, सखाराम ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
याप्रसंगी आ. वैभव नाईक म्हणाले, सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. शेतकरी, विद्यार्थी, इतर सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना जिल्हा बँकेने राबविल्या आहेत. जिल्हा बँकेच्या चांगल्या कामगिरी मुळे अनेक पुरस्कार बँकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे केलेल्या कामगिरीच्या जोरावर मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहतील आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,प्रसन्ना कुबल, प्रसाद रेगे, समीर हडकर, बंडू ठाकूर, आशिष परब, अशोक नांदोस्कर, भास्कर राणे, भूषण परुळेकर,छोटू पारकर, मुरलीधर नाईक, संकेत नाईक,श्रीकांत राणे आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा