You are currently viewing फोंडाघाट येथील तीव्र वळणावर ट्रक अपघातग्रस्त

फोंडाघाट येथील तीव्र वळणावर ट्रक अपघातग्रस्त

फोंडाघाटातील मोठ्या तीव्र वळणावर अॅक्सल तुटल्याने रस्त्या लगतच्या संरक्षक पॅरापिट वर कोल्हापूरकडे जाणारा लेलँड (MH 0FL 6973) मागे येऊन जोरात टेकल्याने मोठा होणारा अपघात टळला. त्याच वेळी कोल्हापूरकडे जाणारा ट्रेलर साईड घेताना गटारात रुतून पडल्याने, दोन्ही बाजूची वाहतूक प्रभावित होऊन ठप्प झाली.

काल रात्रीपासून संततधार कोसळणाऱ्या पाऊस-वारा यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. पीडब्ल्यूडी चे कर्मचारी शाहू- शेळके तातडीने घटनास्थळी पोचले. त्यांनी लगेच लगतचे हॉटेल मालक पवन भालेकर यांच्या खाजगी जेसीबीच्या सहाय्याने भर पावसात ट्रेलर बाजूला करण्यात यश मिळवले. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू झाली.
याच दरम्यान आरटीओ ऑफिस चे जांंभार्डे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य जोमाने सुरू करून, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा