You are currently viewing भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास प्रेरणादायी :- डाॅ .अनिशा दळवी

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास प्रेरणादायी :- डाॅ .अनिशा दळवी

बांदा केंद्रशाळेत प्रभागस्तरीय स्पर्धा संपन्न

बांदा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धात्मक उपक्रमाचा प्रभागस्तरीय टप्पा केंद्रशाळा बांदा नं .१ येथे पार पडला. शिक्षण व आरोग्य सभापती अनिशा दळवी यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर,बांदा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर,गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके ,विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, मुख्याध्याक सरोज नाईक, महेश धुरी ,प्रवीण देसाई केंद्रप्रमुख संदीप गवस ,लक्ष्मीदास ठाकूर ,अनंत कदम, श्रद्धा महाले व शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत बांदा प्रभागातील बांदा,शेर्ले,इन्सुली,नेतर्डे व तांबोळी या केंद्रातील शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना शिक्षण सभापती अनिशा दळवी यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा प्रेरणादायी असून स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे सांगितले. या दिवशी विद्यार्थ्यांच्या रांगोळी ,चित्रकला ,निबंधलेखन,वक्तृत्व या स्पर्धा संपन्न झाल्या .

या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणत्र देऊन गौरविण्यात आले . यातील यशस्वी विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व केंद्रप्रमुख शिक्षक यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी दुर्वा साळगांकर यांनी केले सूत्रसंचालन उपशिक्षक जे.डी पाटील तर आभार केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा