वेंगुर्ला
कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित, रत्नागिरी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे जी. आय. प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी रत्नागिरी येथून संस्थेचे अध्यक्ष डॉ.विवेक भिडे, मुकुंदराव जोशी तसेच प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ल्याचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ज्यांनी या पूर्वी जी.आय. प्रमाणीकरण केलेले आहे व ज्यांची प्रमाणपत्रे आलेली आहेत ती त्यांना वितरीत करण्यात येणार आहेत. ज्यांना नवीन जी.आय.प्रमाणीकरण करावयाचे आहे त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कागद पत्रांची पूर्तता करून त्यांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
ज्या आंबा उत्पादकांना जी.आय. प्रमाणीकरण अर्ज सादर करावयाचे आहेत त्यांनी कार्यक्रमास येताना डिजिटल ७/१२ (मागील ३ महिन्यांतील), फोटो, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इलेक्शन कार्ड किंवा आधार कार्ड, वडिलांचे नावे ७/१२ असून जी.आय.प्रमाणीकरण स्वतःचे नावे करावयाचे असल्यास वडिलांचे व मुलाचे नाव एकत्र असलेले रेशनकार्ड अथवा पॅनकार्ड आदी कागदपत्रे सोबत आणावीत. शासकीय नोंदणी फी व प्रोसेसिंग फी २०१० रु. आहे. ज्या व्यक्तिना जी.आय.रजिस्ट्रेशन करावयाचे आहे त्यांनी नाव नोंदणीसाठी सचिन गावडे (७०६६८५१६०८), सागर गडेकर (९४२२३७९८९५), भूषण नाबर (९४०४३९६२६७) यांच्याशी संफ साधावा.