You are currently viewing भाजपा कडून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रज्ञा ढवण यांचे नामनिर्देशनपत्र दाखल

भाजपा कडून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रज्ञा ढवण यांचे नामनिर्देशनपत्र दाखल

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी सभापती प्रज्ञा ढवण यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र आज बुधवारी दाखल केले.

प्रज्ञा ढवण या गेली ३० वर्षे राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत अनेक पदे भूषवली आहेत. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, गुरुनाथ पावसकर, सुहास सावंत आदी उपस्थित होते. या निवडणुकीत सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपने आघाडी घेतली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा