You are currently viewing ऐश्वर्य मांजरेकर व प्रथमेश सामंत यांना महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार प्रदान

ऐश्वर्य मांजरेकर व प्रथमेश सामंत यांना महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार प्रदान

लोकसेवा अकादमी कडून मालवणच्या दोन सपुत्रांचा सन्मान

मालवण

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईतर्फे आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद तर्फे कला, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक व संशोधन आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुणांना व संस्थेस राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये संस्थेकडून मालवणच्या दोन सुपुत्रांना पुरस्कार देण्यात आले.

मालवण मधील ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर याला समाजरत्न पुरस्कार तर प्रथमेश रत्नाकर सामंत यास कलारत्न पुरस्कार प्रदान करून संस्थेमार्फत सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते असा उदात्त हेतू ठेवून लोकसेवा अकादमी दरवर्षी अशा स्वरूपाचे पुरस्कार प्रदान करते. यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराचा मानकरी म्हणून सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मालवण मधील ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांची राज्यस्तरीय निवड करण्यात आली होती. तर नाट्य, अभिनय, कीर्तन, संगीत आदी विविध कलाक्षेत्रात दर्जेदार कामगिरी करणाऱ्या मालवण कुंभारमाठ येथील प्रथमेश सामंत याची राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल कलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली होती.

या पुरस्कारांचा वितरण सोहळा ऑनलाईन पद्धतीने समारंभाध्यक्ष पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा व मान्यवरांच्या प्रमूख उपस्थीतीत नुकताच संपन्न झाला. यामध्ये ऐश्वर्य मांजरेकर व प्रथमेश सामंत यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, गौरवपत्र, विशेष महावस्त्र, खास मानपत्र, मानकरी बॅच, व मानाचा फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांबद्दल ऐश्वर्य व प्रथमेश या दोघांचेही मालवणवासीयांकडून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा