बाबा मोंडकर, जिल्हाध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग.
जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर ज्या चुकीच्या पद्धतीने कार्यवाही चालू असून हा प्रकार चालू राजिल्यास याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर होणार आहे जिह्यातील पोलीस विभाग पर्यटन व्यावसायिकांना सहकार्य करत असताना पोलीस विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींना त्रास देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत या विषयी गांभीयाने लक्ष देणे गरजेचे आहे .
कोरोना व्हायरस मुळे गेले दोन वर्षें बंदस्थितीत असलेला पर्यटन व्यवसाय थोड्याफार प्रमाणात पूर्वपदावर येत आहे हे होत असताना मागील थकीत बँक हप्ते व्याज लाईटबील .पाणीबिल शासकीय कर यामध्ये स्थानिक प्रशासन व राज्य सरकार कडून कुठलीही मदत स्थानिक पर्यटन व अन्य व्यावसायिकांना मिळालेली नाही आजही पर्यटन व्यावसायिक या कर्जाच्या बोजातून बाहेर येण्यासाठी व्यावसायिक पातळीवर प्रयत्न करत आहे.
जिल्ह्यात गेल्याच आठवड्यात आंबोली येथील डार्क फॉरेस्ट हॉटेल वर पोलीस खात्यामार्फत कार्यवाही करण्यात आली ऍग्रो कॉन्फरंस व पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर रेव्हपार्टी व विदेशी महिला असे दाखवून पोलीस केस दाखल करण्यात आली पण वास्तविकता वेगळी होती या ग्रुप मध्ये आलेल्या महिला या देशातील हैद्राबाद व तेलंगाणा या भागातील होत्या व त्याच भागातील सर्व पर्यटक होते या सर्वांची आधारकार्ड आजही त्या हॉटेल कडे उपलब्ध आहेत व कार्यवाही केली त्यावेळी ऍग्रो कॉन्फरंस संपून पर्यटक जेवण करत होते त्यामुळे अशी कारवाई करणे चुकीचे आहे तसेच सध्या स्कूबाडायव्हिंग साठी गोवा राज्यातून टेम्पोट्रॅव्हलर च्या माध्यमातून मालवण मध्ये येणाऱ्या पर्यटकांना हायव्हेवर अडवून हायवे पोलीसांकडून तासनतास चोकशी केली जाते तसेच तपासणीच्या नावाखाली जिल्ह्यात पोलीस खात्याकडून पर्यटनसाठी आलेल्या व्यक्तींना त्याच्या बॅग खोलणे व अन्य नाहक त्रास दिला जात आहे या सर्व गोष्टीकडे पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सदर विषयी चुकीच्या पद्धतीने चालवलेल्या कार्यवाही थांबविण्याच्या सूचना देण्यात द्याव्यात अश्या पद्धतीने पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तींना त्रास दिल्यास त्याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर होणारा आहे या विषयी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी सदर विषयी लक्ष द्यावे असे आवाहन श्री बाबा मोंडकर .जिल्हाध्यक्ष,पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग याच्यां वतीने करण्यात येत आहे .