कोरोना संसर्गात सिद्धगिरी ठरतोय आधारवड!
विशेष संपादकीय….
कोरोना विषाणू संसार्ग दिवसेंदिवस वाढत आहे. बेड उपलब्ध न झाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. हि गंभीर बाब लक्षात घेवून आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या सौजन्याने व सिद्धगिरी मठाचे पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी कोविड हॉस्पिटलच्या तिसऱ्या विभागाचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त श्री.कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी, नरेश चंदवाणी, भावेश पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
‘निराधारांना आधार’ या तत्वावर काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर सुरु आहे. कोल्हापुरात कोरोना संसर्ग वाढू लागल्यावर बेडची कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली. बेड न मिळाल्याने कोणास प्राणास मुकावे लागू नये म्हणून अल्पावधीत सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये कोरोना विभाग कार्यरत झाला. एक महिन्याच्या कालावधीत अनेको कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. आरोग्यपूर्ण नैसर्गिक सानिध्य लाभल्यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी अल्प दरात विलगीकरण कक्ष हि चालवण्यात येत आहे. सिद्धगिरी हॉस्पिटलच्या या दोन्ही कोरोना विभागांना समाजातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
तरी वाढता संसर्ग पाहता रुग्णांसाठी आणखी बेडची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्यामुळे मा.आ.चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने सिद्धगिरी हॉस्पिटलचा नवीन तिसरा विभाग सुरु होत आहे. यामध्ये प्रामुख्याने सात बेड व्हेंटीलेटर, तेवीस ऑक्सिजन बेड व सामान्य दहा बेड असे सुमारे चाळीस बेडचे अद्यावत कोविड रुग्णालय लोकांच्या सेवेत दाखल होत आहे. कोरोना संसार्गानंतरही उद्भवणाऱ्या अनेक आजारांवर उचार करणारे केंद्र म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटल नावारूपास येईल. अद्यावत उपकरणे, तत्पर वैद्यकीय स्टाफ, कोरोना निदानासाठी एच.आर.सिटी., अद्यवत प्रयोगशाळा एकाच छताखाली सर्व वैद्यकीय सुविधा मिळत असल्यामुळे सिद्धगिरी हॉस्पिटल कोरोनाग्रस्तांसाठी एक आधारवड ठरणार आहे.