You are currently viewing खासगी सेवा घ्या पण सिंधुदुर्गातील जनतेचा जीव वाचवा…

खासगी सेवा घ्या पण सिंधुदुर्गातील जनतेचा जीव वाचवा…

प्रमोद जठार, कोरोना रुग्णसेवा देणाऱ्या संस्थेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे…

कणकवली :

जिल्हा कोविड रुग्णालयात पुरेसे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी तातडीने मान्यता द्या आणि सिंधुदुर्गातील कोरोना भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज दिली.
नसल्याने अनेक कोविड रूग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापार्श्वभूमीवर कोविड रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्था प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. त्याला रूग्णांचा जीव वाचवा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती श्री.जठार म्हणाले, अवघ्या दोन डॉक्टर्सच्या साहाय्याने जिल्हा रूग्णालयातील कोविड सेंटर चालवले जात आहे. यात रुग्णांची हेळसांड होत हे चित्र बदलण्यासाठी आम्ही मुंबईतील एका खासगी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्था प्रस्ताव आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. ते म्हणाले, सिंधुदुर्गातील किमान १०० रूग्णांना तज्ज्ञ डॉक्टर्स आणि दर्जेदार रूग्ण सेवा देण्यासाठी महिन्याला दीड कोटींचा खर्च येणार आहे. तर कोविड रुग्ण उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडे २० कोटींचा निधी पडून आहे. त्यामुळे खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेचा प्रस्ताव मान्य करावा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. याखेरीज कोविड सेंटर साठी आणखी निधी लागल्यास त्याची मागणी राज्य शासनाकडे करावी इथल्या लोकप्रतिनिधींमार्फत आम्ही त्याचा पाठपुरावा करू असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा