मुंबई :
आज दिनांक २६-११-२०२१, संविधान दिनानिमित्त मुंबई मधील विक्रोळी येथील अस्मिता कॉलेज ऑफ लॉ च्या फ्री लीगल एड क्लिनिक विभागाने शहरातील सरकारी व खाजगी कार्यालये, हॉस्पिटले, सामाजिक संस्था, शाळा, सहकारी गृहनिर्माण संस्था, उद्याने, अशा विविध ठिकाणी संविधानाविषयी जनजागृती कारण्याहेतू संविधान पठण हा उपक्रम यशश्वीरित्या राबवला. मुंबई शहर आणि उपनगरातील अशा ५० पेक्षा अधिक ठिकाणी एकाच दिवशी हा उपक्रम राबवणारे अस्मिता कॉलेज हे एकमेव कॉलेज आहे असे समाजातील काही मान्यवरांचे म्हणणे आहे. या उपक्रमाची सुरुवात अस्मिता कॉलेज ऑफ लॉ चे मुख्याध्यापक डॉक्टर श्री एच. एस. गोरगे सर यांच्या वेबिनार ने झाली, कॉलेज च्या सुमारे ३५० आजी व माजी विद्यार्थ्यांनी या वेबिनार मध्ये आपला सहभाग नोंदविला. डॉक्टर श्री गोरगे सरांनी या वेबिनार मध्ये संविधानाची गरज आणि संविधानाची निर्मिती तसेच वेळोवेळी संविधानात झालेले बदल याविषयी सविस्तर माहिती दिली.
फ्री लीगल एड क्लिनिक चे मुख्य श्री केशव तिवारी यांनी या उपक्रमाची रूपरेषा ठरवून विद्यार्थ्यांना संविधान वाचन यशस्वीपाणे पारपाडण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच फ्री लीगल एड क्लिनिक मार्फत वेळोवेळी जनजागृती साठी असे उपक्रम भविष्यात हि घेण्याची ग्वाही दिली.
आपण समाजात वावरत असताना, या समाजा प्रति आपले काही देणे लागते, आणि त्यासाठी असे सामाजिक उपक्रम सतत राबवण्यासाठी सस्मित कॉलेज ऑफ लॉ ची मॅनेजमेण्ट सदैव बांधील राहील अशी खात्री यावेळी, डॉक्टर श्री एच. एस. गोरगे सर यांनी व्यक्त केली.
खरोखरच अस्मिता कॉलेज ऑफ लॉ नेहमीच समज विमुखं ,समाज उपयोगी असे अनेक उपक्रम नेहमीच राबवित असते आपल्या परंपरेला अनूसरून २६ नोव्हेंबर २०२१ सविधान दीन सुद्धा अस्मिता कॉलेज ऑफ लॉ आणि फ्री लीगल एड क्लिनिक संस्थेच्या विधमाने सविधान कार्यक्रम सुद्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. गोरगे सर आणि अतिशय मार्मिक असे मार्गदर्शन केले तसेच फ्री लीगल एड चे प्रमुख डॉ.केशव तिवारी सरांनी विद्यार्थांना सविधान प्रस्तावना वाचनासाठी प्रोत्साहन दिले त्यानुसार विद्यार्थ्यांनी समाजामध्ये अनेक ठिकाणी जाऊन सविधान प्रस्तावना वाचनाचा उपक्रम राबविला व समाजामध्ये भारतीय लोकशाही सविधानाचा प्रसार – प्रचार करून सवीधानाविष्यी जागृती घडविनाचा प्रयत्न केला.धन्यवाद प्राचार्य डॉ. गोरगे सर आणि डॉ.केशव तीवारी सर आणि या उपक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी मित्रांनो.आम्हाला आमच्या अस्मिता लॉ कॉलेजचा अभिमान आहे धन्यवाद!.