You are currently viewing जिल्हा युवा क्रीडा शिक्षकांची कार्यकारणी गठीत होणार..

जिल्हा युवा क्रीडा शिक्षकांची कार्यकारणी गठीत होणार..

युवा क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांनी संपर्क साधण्याचे दिनेश म्हाडगुत यांचे आवाहन

कासार्डे: प्रतिनिधी

शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग अंतर्गत महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सलग्न असलेली सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी गठीत करावयाचे आहे.
या कार्यकारिणीत जिल्ह्यातील यूवा शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक, अनुदानित, विनाअनुदानित शाळेत कार्यरत तसेच बीपीएड,एमपीएड बेरोजगार शिक्षक,राज्य राष्ट्रीय खेळाडू व सध्या विविध शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून विषय शिकवत असलेल्या युवा शिक्षकांची ही कार्यकारिणी तयार केली जाणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील यूवा क्रीडा शिक्षकांचा बेरोजगाराचा प्रश्न, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा हा क्रीडा क्षेत्रात आग्रेसर ठेवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे.
या नुतन कार्यकारणीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील ४० वर्षाखालील युवा शिक्षक,प्रशिक्षकांनी व खेळाडूंनी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण मोबा-९४२११४४६०५ तसेच शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक यूवा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव दिनेश म्हाडगुत मोबा- ९४०४३४४४६० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य सचिव दिनेश म्हाडगुत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + six =