You are currently viewing सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखम राजे सावंत भोसले यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिरचे उद्घाटन शनिवारी

सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखम राजे सावंत भोसले यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिरचे उद्घाटन शनिवारी

सावंतवाडी

 

सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टीपर्पज हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिरचे उद्घाटन शनिवार दिनांक 27 -11- 2021 रोजी सकाळी ठीक दहा वाजता सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखम राजे सावंत भोसले यांची सौभाग्यवती राणी श्रीमती सौ श्रोद्धा लखम राजे सावंत भोसले यांच्या शुभहस्ते शिबिराचा शुभारंभ होणार असून यासाठी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी दिली आहे

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांना जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी निवेदन देऊन सावंतवाडी राजवाडा येथे कै.श्रीमती राणी सत्वशीला देवी सावंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत 2013 नोव्हेंबर पूर्वी राजवाडा येथे खाजगी भेटीसाठी राजमाता यांना भेटण्यासाठी आले असता ही योजना मुख्यमंत्री व तसेच राजघराणे यांच्या नातेसंबंधामुळे मंजूर करण्यात आली.

तसेच गोवा बांबूळी येथे तीन वर्षांपूर्वी सत्वशिला देवी भोसले यांच्या नातेसंबंधामुळे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे साहेब यांनी सदरील योजना महाराष्ट्रातील विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या मागणीनुसार तसेच दोडामार्ग जन आक्रोश आंदोलन च्या मागणीनुसार सदरची योजना मंजूर करण्यात आली.

गेल्या वर्षी महाराष्ट्रातील 97 लाख 29 हजार रुग्णांनी वेगवेगळ्या 971 प्रकारच्या आजारावरती मोफत शस्त्रक्रिया, औषधे, जेवण व प्रवास खर्च मिळवला असून त्याचे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सावंतवाडी संस्थानच्या राजमाता कै. सत्वशीला देवी भोसले यांना जाते.

यामध्ये 2017 साली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना अशाप्रकारे या योजनेचे नामकरण करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान तसेच अथायु मल्टीपर्पज हॉस्पिटल यांनी आयोजित केलेल्या हृदयविकार व दुर्बीण द्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन शिबिर शनिवार दिनांक 27-11-2021 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत होणार असून पत्ता काझीशहाबुद्दीन हॉल एसटी स्टँड, प्रांत ऑफिस समोर सावंतवाडी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सफेद पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना तसेच आधार कार्ड किंवा मतदान कार्ड बँकेचे फोटो पासबुक ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड यापैकी एक असणे आवश्यक आहे.

यामध्ये मोफत शस्त्रक्रिया, औषधे, जेवण व प्रवास खर्च या योजनेअंतर्गत दिले जाते यासाठी एक महिन्याच्या आत सोनोग्राफी रिपोर्ट व तसेच यापूर्वी डॉक्टरांनी दिलेली औषधे व सोनोग्राफी रिपोर्ट रुग्णांनी आणून या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा.

या शुभारंभाच्या वेळी सावंतवाडी संस्थान चे श्रीमंत युवराज लखन राजे सावंत भोसले व त्यांची पत्नी सौभग्यावती श्रोद्धा लखन राजे सावंत भोसले उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते सकाळी दहा वाजता या महाआरोग्य शिबीराचा शुभारंभ होणार आहे तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र प्रभाकर मसुरकर जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा