You are currently viewing कुटीर रुग्णालयाच्या अपूर्ण कामाबाबत दिपक केसरकर आक्रमक….

कुटीर रुग्णालयाच्या अपूर्ण कामाबाबत दिपक केसरकर आक्रमक….

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत गेले काही दिवस ओरडा असल्याने आज आमदार दीपक केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम व उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी घेऊन पाहणी केली. यावेळी अपूर्ण असलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.ही कामे जाणीवपूर्वक अपुर्ण ठेवणाऱ्या घेवारी नामक ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाका,अशा सूचना त्यांनी केल्या.

दरम्यान रूग्णालयाच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी रुपये देऊन सुद्धा चांगले काम होत नसेल ठेकेदार दुर्लक्ष करत असेल तर ते योग्य नाही,अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.येत्या आठ दिवसात आपण पुन्हा येऊ तोपर्यंत तुम्ही कामे पूर्ण करा अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही,असे केसरकर म्हणाले. श्री केसरकर यांनी आज उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.
यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,अशोक दळवी,योगेश नाईक, माजी नगरसेवक सुदन आरेकर,राजन मुळीक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा