You are currently viewing रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी व कर्ला मच्छिमार सह. संस्था कर्ला रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मच्छिमार दिवस साजरा

रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी व कर्ला मच्छिमार सह. संस्था कर्ला रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मच्छिमार दिवस साजरा

21 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मच्छिमार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून मासेमारांसाठी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, किसान क्रेडिट कार्ड योजनेची माहिती देण्यात आली. मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी यांच्या वतीने मा. श्री नागनाथ भादुले, सहाय्यक मत्स्य आयुक्त,मत्स्य व्यवसाय विभाग  रत्नागिरी   यांनी मासेमारांना  किसान क्रेडिट कार्ड ,  प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजनेची माहिती दिली.

कर्ला मच्छिमार सह. संस्थेचे अध्यक्ष श्री नदीम सोलकर यांनी मत्स्य विभागाच्या योजनाचे स्वागत केले व या योजनांचा  जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचाव्यात अशी विनंती केली   . गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे सामाजिक शास्त्र विभागाचे प्राध्यापक श्री  तुळशीदास रोकडे यांनी कर्ला  सहकारी  मच्छीमार संस्थेवर विविध सामाजिक अनुषंगाने संशोधन करत असल्याची माहिती दिली. कार्यक्रमात  मत्स्य विकास अधिकारी श्री. र . प ,राजम , सहाय्यक मस्त्य विकास अधिकारी  प्रतीक महाडवाला,स्वप्नील चव्हाण, कार्यलय अधीक्षक बा.नि.  म्हस्के, मत्स्य क्षेत्र निरीक्षक श्री. भागवत होरटे यांनी मासेमारांना मस्त्य दिनाच्या शुभेच्या देऊन , जागतीक मत्स्य दिनाचे महत्व सांगितले.

तसेच रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या मासेमारासाठी असलेल्या विविध सेवाचि माहिती दिली व प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना प्रत्येक मासेमारा पर्यंत ध्वनी संदेश व व्हाट्सअप च्या माध्यमातून पोहचवण्याचं प्रयत्न करणार असल्याच नमूद केले. मत्स्य विभागाचे सागरमित्र यांनी कार्क्रमाचे व्यवस्थापनामध्ये सहकार्य केले. मासेमारांचं कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे नियोजन कर्ला मच्छिमार संस्था व रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहाय्यक श्री चिन्मय साळवी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा