लेख: अहमद मुंडे
अंगावर काटा उभा करणारी एक ह्रदय द्रावक हाक आपण वेळोवेळी ऐकतो अनुभवतो कोणी पाण्यात बुडताना. जळीत प्रकरणं. अपघातग्रस्त. एखाद्या प्रकरणात संकटात सापडलेला प्रत्येक माणूस कोणाला कोणाला तरी जीवाच्या आकांताने ओरडून मदत मागतो कारणं त्याने जीवन संपताना जवळून पाहिले असते.
# वाचवा ओ साहेब # ही हाक आपल्या ३६ जिल्ह्यातील त्या त्या जिल्ह्याचे मायबाप म्हणजे जिल्हाधिकारी यांना दिली आहे कारण आज प्रस्थिती तशीच निर्माण झाली आहे. कारणं प्रत्येक गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये कमीत कमी वेळात जास्त पैसा. कमी श्रमात जास्त पैसा असा फंडा अमलात आणला जातो आहे. जागोजागी तयार होणा-या. राजकीय बॅंका पतसंस्था. बजाज फायनान्स. मायक्रो फायनान्स. बंधन बॅंक. बुलढाणा फायनान्स प्रत्येक गावातील प्रतिष्ठित महिला. यांना आर्थिक लालच दाखवून दहा दहा महिला गटाच्या माध्यमातून हा गोरख धंदा चालतो . एका मिनिटात आधारकार्ड वर लोन. विविध बिझनेस कंपन्या. साखळी पध्दतीने व्यवसाय बिझनेस. विविध शेती संलग्न व्यवसाय. कुक्कुटपालन शेळीपालन शेती औजारे. बि बियाणे खते विविध. जैविक खते. औषध फवारणी यामध्ये चालणारे दोन नंबर. औषध बोगसगिरी. खते बी बियाणे बोगस. असा लुटीचा प्रकार आहे
शासकीय योजना. यामध्ये एजंट दलाल अधिकारी व कर्मचारी यांचे मनमानी कारभार.
आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये जागोजागी अशी काही समाजाच्या. नावाखाली. अमुक पैसे भरा आणि तमुक तमुक वेळेत. मोठा आर्थिक लाभ घ्या. आपण सुद्धा खुळ्या सारखें व्याजाने काढून उसणेपासने करून अशा बोगस कंपन्या मध्ये अशा चोरांच्या हातात आपली कष्टाची मिळकत देतो. आणि पूर्णपणे फसतो. असे चोर तयार होतात एखाद्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये अलिशान आॅफिस घेतात अधिकारी व कर्मचारी मागेल त्या पगारावर कामाला ठेवतात. अलिशान बंगल्याची आश्वासने. अलिशान महागड्या गाडया अशी एक भुलभुलैया. तयार केली जाते आणि. पहिल्यांदा येणारे ग्राहक यांना. आर्थिक लाभ दिला जातो आणि बघता बघता यांचा चोर बाजार जोरात जोमात चालतो. अलिशान हाॅटेलमधये सेमिनार. महागड्या गिफ्ट. दिल्या जातात. प्रत्येक गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये यांचें एजंट नेमले जातात त्यांना पगार कमिशन दिल जात. सर्व काही अगदी सुरळीत चालते. समाजातील नामांकित लोक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचा अशा बोगसगिरी करणार्या कंपनीला वरदहस्त असतो.
मोठमोठ्या कंपन्या गव्हरमेंटचया असणार्या बुडाल्या काही जण पैसा देणार होते काहीजण जमीन देणार होते. तर काहिजण. नोकरी देणार होते. काहीजण गाड्या बंगले. देणार होते. काहीजण शेळया कोंबड्या अंडी. मचछिपालन. अशी विविध अमिष दाखवून आपणास लुटणारे आपल्या ध्यानात येई पर्यंत बरिच मोठी आर्थिक माया गोळा करतात आणि रातोरात पोबारा करतात.
परवा एक विषय आला आहे मोबाईल वर एक मॅसेज फिरत आहे २२५० रु भरा आणि ३२ लाखाचे मालक व्हा. तुम्ही मेंबर कराल तेवढे पैसे तुमहाला मिळणार. अस होत का ? आपण सुद्धा खुळ्या प्रमाणे या सर्वांच्या माग जातो आणि जाताना एकट न जाता. सगेसोयरे. मित्रपरिवार. यांना सुध्दा घेवून जातो म्हणजे बुडताना एकट न बुडता सगळी बुडू आणि चोरांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत
सर्व जिल्हाधिकारी यांना कळकळीची विनंती आहे की आपल्या जिल्ह्यात गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक. मिळेल ते काम करून अर्धपोटी उपाशी राहून आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करित आहेत. आपण आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये दाखल होणारें. कोणतीही परवानगी शिवाय आपले बोगस उधोग उभे करणारे यांची माहिती. आपल्याच नव्हेतर. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका. क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा नसते. म्हणजे आपल्या गावात तालुका जिल्हा यामध्ये आपल्या बोगस उधोगाची. प्रसिद्धी प्रसार जाहिरात करण्यासाठी फिरणारे कोणाच्या परवानगीने फिरतात. त्यांना कोण परवानगी देते यासाठी मा जिल्हाधिकारी साहेब यांनी ग्रामपंचायती क्षेत्रात असा फसवा व्यवसाय करणारे यांच्यासाठी गावबंदी आदेश जारी करणे गरजेचे आहे. तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये सुद्धा बंदी आदेश काढणे गरजेचे आहे
असा कोठेही प्रकार घडत असेल त्या संबंधित आपणाकडे तक्रार आल्यास त्वरित जवळच्या पोलिस स्टेशनला आदेश देवून चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत.
जनतेने कमीत कमी वेळात जास्त पैसा मिळविण्यासाठी कोणत्याही भुलभुलयाला बळी पडू नका. फसलेल्या लोकानी विविध आंदोलने केली. मोर्चे काढले. न्यायालयात धाव घेतली काहीजणांनी आत्मदहन केले. उपोषणे केली. पण अशी विविध प्रकारची आंदोलने करून सुध्दा आजपर्यंत आर्थिक लुटललेलया. लोकांना न्याय मिळालाच नाही तुम्ही मेला कोणालाच फरक पडत नाही. तुम्ही उपाशी राहीला तरी कोणाला काही फरक पडत नाही. जनता जोपर्यंत फसणार आहे तोपर्यंत फसवणारे येणारच. तुम्ही देताय म्हणून हे घेतायत. आजच तुम्ही जागा आणि दुस-याला जाग करा.
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
शासकीय अधिकारी यांचेसाठी
शासकीय अधिकारी आपल्या पदांचा वापर. समाजहितासाठी करू शकतो. कोणताही शासकीय अधिकारी गोरगरीब सर्वसामान्य लोकांना आपल्या पदाच्या जोरावर. अन्याय अत्याचार करू शकत नाही
शासकीय अधिकारी व्याजाने पैसे घेवू अथवा देवू शकत नाही.
माझा मामा काका भाऊ मित्र चुलता. जवळचा पाहुणा. शासकीय अधिकारी आहे म्हणून मी महणील तसच होईल असे कोणीही म्हणू शकत नाही
शासकीय प्रशासकीय अधिकारी. पोलिस. तहसिलदार. प्रांत. मंडलधिकारी. ग्रामसेवक. तलाठी. नायब तहसीलदार. गटविकास अधिकारी. मुख्य अधिकारी. कार्यकारी अधिकारी. पंचायत समिती विभाग. जिल्हा परिषद विभाग. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली येणारी विविध शासकीय निमशासकीय कार्यालये. अशी एक नाही अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या व आपल्या घरच्या कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांच्या पदाच्या जोरावर शेजारी. यांना शिविगाळ करणे. दम देणें. जीवे मारण्याची धमकी देणे. दहशत गुंडगिरी. व्याजाचा व्यवसाय. आपल्या परिसरात दहशत माजविणयासारखे. कृत्य करणे. दारु पिऊन लोकांना त्रास देणारा अधिकारी व कर्मचारी. महसुल विभागात याचा गुंठा त्यांच्यात घालणारे अधिकारी. अशी एक नाही अनेक अधिकारी आपल्या पदांचा गैरवापर करून नागरिकांना त्रास देत असतात. आजच शासनाने एक शासन निर्णय जारी करण्याची गरज आहे जो कोणी अधिकारी व कर्मचारी आपल्या पदाच्या जोरावर गोरगरीब लोकांना. सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देत असेल आणि जर त्या सर्वसामान्य माणसाने गोरगरीबाने संबंधित. शासकीय अधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यास शासनाने व जिल्हाधिकारी साहेब यांनी विना चौकशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे आणि लोकांना संरक्षण द्यावे.