You are currently viewing त्या’ गार्डनचे लोकार्पण येत्या पंधरा दिवसात – बाबुराव धुरी

त्या’ गार्डनचे लोकार्पण येत्या पंधरा दिवसात – बाबुराव धुरी

दोडामार्ग

कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु झाली असून कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या माध्यमातून,आमदार दीपक केसरकर व माजी नगराध्यक्षा लीना कुबल यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेल्या व आता पूर्णत्वास आलेल्या गार्डनचे लोकार्पण येत्या १५ दिवसात केले जाईल अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी व राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर यांनी दिली आहे.दोडामार्ग शहरासाठी शिवसेना व आघाडीच्या नगराध्यक्ष लीना कुबल यांच्या कालावधीत शिवसेनेचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून निधी दिल्याचे धुरी यांनी सांगितले.

शहरवासीयांची प्रमुख मागणी असलेल्या गार्डनला सुद्धा शिवसेनेनं निधी दिला होता. आता या गार्डनचे काम पूर्णत्वास आले असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा लीना कुबल, माजी नगरसेवक दिवाकर गवस यांना सोबत घेत शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, राष्ट्रवादी तालुकाप्रमुख प्रदीप चांदेलकर, माजी नगराध्यक्षा लीना कुबल, भाई परमेकर, आनंद रेडकर, प्रशांत केरकर, हर्षद सावंत, गुरू सावंत, गौतम महाले, करण ठाकूर, आनंद तुळसकर आदी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गार्डन ची पाहणी केली. शनिवार असल्याने संबंधित ठेकेदार व सीईओ यांच्याकडून झालेल्या कामांचा आणि प्रत्यक्ष गार्डनमध्ये जाऊन आढावा घेता आला नसला तरी ज्या त्रुटी असतील त्या येत्या दहा दिवसांत पूर्ण करून घेतल्या जातील व शहरवासीयांना अत्यंत आवश्यक असलेल्या गार्डनचे लोकार्पण केलं जाईल अशी माहिती धुरी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा