You are currently viewing शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावच्या अध्यक्षपदी श्री. प्रदीप प्रभूतेंडोलकर यांची फेरनिवड

शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावच्या अध्यक्षपदी श्री. प्रदीप प्रभूतेंडोलकर यांची फेरनिवड

…तर सचिवपदी श्री. मुकुंद धुरी यांची निवड

झाराप :

शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावच्या अध्यक्षपदी श्री. प्रदीप प्रभूतेंडोलकर यांची फेरनिवड करण्यात आली. तर श्री. मुकुंद धुरी यांची संस्था सचिवपदी निवड करण्यात आली. तसेच श्री.  ज्ञानदेव चव्हाण व श्री. पद्माकर धुरी यांची अनुक्रमे उपाध्यक्ष व सह सचिव म्हणून निवड करण्यात आली.

वार्षिक सर्व साधारण सभेत निवड करण्यात आलेले कार्यकारणी सदस्य यांची सभा श्री सतीश साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नवनियुक्त सदस्य श्री नामदेव धुरी, श्री सुनील बगळे, ऍड. विवेक मांडकुलकर, श्री रमाकांत धुरी, श्री शंकर बोभाटे, श्री भास्कर परब, श्री शांताराम धुरी हे उपस्थित होते यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी निवड संपन्न झाली.

या सभेत स्वीकृत सदस्य म्हणून श्री मोहन सावंत, श्री तुकाराम गोडे, श्री देवेंद्र प्रभूतेंडोलकर, श्री प्रताप कुडाळकर, श्री दशरथ राऊळ यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे जेष्ठ सदस्य श्री सतीश साळगावकर, तसेच विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार व अन्य संस्था सदस्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी आपण सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा