You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या अध्यक्षपदी रमण वायंगणकर

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या अध्यक्षपदी रमण वायंगणकर

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची नूतन कार्यकारणीची निवडण्यात आली आहे. महासंघाच्या अध्यक्षपदी रमण वायंगणकर यांची तर सरचिटणीस पदी विकास वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी उर्वरित कार्यकारणीही निवडण्यात आली आहे.

भंडारी महासंघाची सर्वसाधारण सभा सिद्धीविनायक मंगल कार्यालय कुडाळ येथे घेण्यात आली. सभा अध्यक्ष तथा निवडणूक अधिकारी म्हणून महासंघाचे माजी सरचिटणीस राजू गवंडे यांनी काम पाहिले. या सभेत जिल्हाध्यक्ष म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील रमण शंकर वायंगणकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा सरचिटणीसपदी विकास वैद्य यांची निवड करण्यात आली. महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्षपदी देवगडचे हेमंत करंगुटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी मालवण कट्टा येथील सुनिल नाईक, दोडामार्गचे संजय खडपकर यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा सहसचिवपदी व प्रसिद्धीप्रमुख पदी कुडाळचे समील जळवी तर सहसचिव पदी सावंतवाडीचे उल्हास हळदणकर, खजिनदार म्हणून कणकवलीचे लक्ष्मीकांत मुंडये यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी माजी अध्यक्ष अतुल बंगे, रमण वायंगणकर, समील जळवी, राजू गवंडे, सुनिल नाईक, जयप्रकाश चमणकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, प्रकाश पावसकर, गजानन वेंगुर्लेकर, विकास वैद्य, शरद पावसकर, विलास आसोलकर, संजय खडपकर, मोहन गवंडे, परितोष गवंडे यांसह अन्य भंडारी समाज बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा