कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग मनसेचे कोरोना मदत केंद्र उद्यापासून जनतेसाठी कार्यान्वित होत आहे. जिल्हा रुग्णालय ओरोस समोर उद्या गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी ठीक 11.00 वाजता या मदत केंद्राचे उद्घाटन परशुराम उपरकर यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे. जिल्ह्यात कोरोना आपत्ती कार्यकाळ चालू झाल्यापासून कोरोना रुग्णांची होणारी हेळसांड व कोविड सेंटर मधील गैरसोयी याबाबत अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत. मनसेने या संदर्भात तीव्र आंदोलन देखील छेडले होते. जिल्हा रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होणारा मनस्ताप, सोयी-सुविधा सुविधांची गैरसोय आधी गोष्टींबाबत मदत केंद्र म्हणून मनसेचा हा उपक्रम आहे. जिल्ह्यातील जनतेला कोरूना आपत्तीत धीर देणारा व आपत्तीत रस्त्यावर उतरून सहकार्य करणारा मनसेचे एकमेव पक्ष ठरला आहे. जिल्ह्यातील जनतेने कोरोना केंद्रात होणारी गैरसोय व सुविधांबाबत सहकार्य हवे असल्यास तसेच मार्गदर्शनासाठी मनसेच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात येत आहे.