You are currently viewing मालवण शहरासाठी ७ कोटींचा निधी : आ. वैभव नाईक यांची माहिती

मालवण शहरासाठी ७ कोटींचा निधी : आ. वैभव नाईक यांची माहिती

मालवण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मालवण शहरासाठी ७ कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. यामध्ये दोन कोटींचा निधी रस्ते विकासासाठी वापरला जाणार असून ५ कोटींचा निधी शहरातील मत्स्यालयासाठी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी मत्स्यालयासाठी ५ कोटी रुपये उपलब्ध झाले असून आतापर्यंत १० कोटी मत्स्यालयासाठी उपलब्ध आहेत. मत्स्यालयाच्या भूसंपादनासाठी निधीची आवश्यकता असून यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निधीसाठी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांचे मार्गदर्शन लाभले असे ते म्हणाले.

येथील शिवसेना कार्यालयात आमदार वैभव नाईक पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, तपस्वी मयेकर, पंकज सादये, दीपक देसाई, प्रसाद आडवलकर, बाळू नाटेकर, उमेश मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, अक्षय मडये आदी उपस्थित होते.

मत्स्यालयासाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या माध्यमातून भूसंपादनासाठी प्रयत्न सुरू असून भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर मत्स्यालयाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असे आ. नाईक म्हणाले. दरम्यान, मालवण नगर परिषदेचा अग्निशमन प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. लवकरच याबाबतचे आदेश निर्गमित होतील, असेही वैभव नाईक म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 2 =