गोडबन हॉटेलमधील जुगाराच्या बाजारात खळबळ….
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैद्य धंद्यांना जोर चढला आहे. जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक बदली होऊन गेल्यामुळे नवीन जिल्हा पोलिस अधिक्षकांचा कार्यभार प्रभारी असून नवीन अधिकाऱ्यांनी अजून पदभार सांभाळलेला नाही, त्यामुळे अवैध्य धंदेवाल्यांसाठी मात्र रान मोकळे झाले आहे. खारेपाटण येथे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर बसलेला जुगाराचा बाजार खाकिच्या झारीतील शुक्राचार्यानी जुगाऱ्यांना सावध केल्यामुळे तात्काळ गुंडाळला गेला. संवाद मीडियाला जुगारांच्या हालचालीबाबत कोण माहिती पुरवतो याचा आढावा घेऊन पुढचा अड्डा कुठे बसवायचा यासाठी जुगाराची तकशीम घेणाऱ्या सर्वांची मिटिंग कणकवली येथे झाली.
खारेपाटण येथेही बसलेल्या कालच्या जुगाराच्या बाजारातील पैशांची लाखो रुपयांची वाटणी कणकवली येथे झाली. काल बसलेला अड्डा संवाद मीडियाने बातमी देताच खाकीने दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्यानंतर तात्काळ उठला. खारेपाटण येथे गोंधळ उडाल्यानंतर जुगाराची तकशीम असलेल्या अट्टल जुगाऱ्यांची कणकवली येथील टिंगेल कोंतेरे, फोंडयाच्या पारावरच्या विठ्ठल जप करणाऱ्या वारकऱ्यासहित सर्वांनी कणकवली येथे पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेतली.
जातील तेथे संकट येत असल्याने धावपळ उडालेल्या जुगाऱ्यांनी पुढील अड्डा पुन्हा एकदा बांदिवडे किव्हा फोंडा या दोनपैकी एका ठिकाणी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. बांदिवडे गणपती मंदिर च्या मागे दोन दिवसांपूर्वी जुगाराची तकशीम बसली होती, परंतु संवाद मीडियाने बातमी दिल्यावर तिथून ते खारेपाटण येथे सुरक्षित जागी गेले होते. परंतु खारेपाटण येथील जागेची सुद्धा माहिती संवादला मिळताच पुन्हा एकदा खाकीच्या आशिर्वादाने जुगारी सहीसलामत सुटले.
बांदिवडे अथवा फोंडा येथे पुन्हा बस्तान बसविण्याच्या विचारात असलेले जुगारी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाची परीक्षा आहे. पुन्हा खकितील खबरी जुगाऱ्यांना इशारा देऊन सोडवतात की सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस जुगाऱ्यांवर धाड टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल…