You are currently viewing कंगणा राणावत विरोधात सिंधुदुर्ग काँग्रेसची जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तक्रार

कंगणा राणावत विरोधात सिंधुदुर्ग काँग्रेसची जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तक्रार

“भारताला १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती एक भीक होती” असं वक्तव्य करणाऱ्या वादग्रस्त सिने अभिनेत्री कंगणा राणावत हिच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये तालुकाध्यक्षांच्या सहीने तक्रार अर्ज देत दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही होण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
सिने अभिनेत्री कंगणा राणावत हिने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये १९४७ ला भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती एक भीक होती असे वक्तव्य करून देशासाठी आपला संसार आणि रक्ताचे, जीवांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा आणि देशातील १३५ कोटी जनतेचा अपमान केला आहे. कंगणा हिने केलेले वक्तव्य हा दखलपात्र गुन्हा असून भारतीय दंड संहितेतील तरतुदीनुसार कंगणा राणावत हिच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती फौजदारी कारवाई करावी अशी तक्रार जिल्ह्यातील प्रत्येक तालुका काँग्रेस कडून तालुक्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
कंगणा राणावत हिच्या कृत्यामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचा अपमान झालेला असून स्वतंत्र्य भारतातील एका व्यक्तीने असे वक्तव्य करणे ही शरमेची बाब आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने तक्रार अर्ज दाखल करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा