दोडामार्ग
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग आणि वालावलकर हाँस्पीटल डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने कँन्सरचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते.या प्रशिक्षणाचे मुख्य कारण म्हणजे जिल्हामध्ये वाढते कँन्सरचे रुग्ण,जिल्ह्यामध्ये जशी पाहिजे तशी या आजाराबाबत जागृकता नाही. तसेच याबाबत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. या करीता हे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. या प्रशिक्षणामध्ये काही नर्सना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर संशयास्पद जर रुग्ण असतील तर त्याच्यावर निदान करण्यात येईल. त्यासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची टीमसुद्धा असणार आहे. आजाराचे स्वरूप गंभीर दिसून आल्यास पुढील उपचार वालावलकर हाँस्पीटल डेरवण येथे करण्यात येईल अशी माहिती जि. प.शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी यांनी दिली आहे.