You are currently viewing लगीन तुळशीचा

लगीन तुळशीचा

दिवाळी सरली तरी
सोपना नाय पावसाचा धुमशान
धरतीवर म्हणता प्रेम बसला
म्हनान लागता हा बेभान
भाता झाली कापून
कुणग्यात पाणी भरला
कशी पेंडका बांधशीत
फाटला नवसाचा इरला
गतसाली असाच झाला
तेवा शेती सोडली लोकांनी
निसर्गाचा चक्र फिरला
जीव टाकलो कोपऱ्यानी
नोको म्हणतत लुकसानी
पावस इंग्लंड सारखो लागता
फॉरेनर आसल्यासारखोच
निमरात उघडो होऊन धावता
तुळस सजली दारात
इले नवरकारी मांडवात
पावसापुढे सांगा तरी
कशी लावची सांजवात
कणो गेलो व्हावान
नवरो नवरी गेली भिजान
पावस धरतीच्या प्रेमात
लगीनकरांचा गळात अवसान
ओत ओत ओतान पावस
वायच आता थांबलो
तिनसांजचो विवाह तुळशीचो
राती उशिरसर लांबलो

©{दिपी}
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा