बांदा
उमेद फौंडेशन ही संस्था अनाथ, वंचित व गरजू असणाऱ्या हुशार विद्यार्थांना शैक्षणिक मदतीसाठी सामाजिक भान जपणाऱ्या दानशूर लोकांच्या मदतीने कार्यरत आहे. आजपर्यंत नव्वदहून अधिक विद्यार्थीं या मदतीचा लाभ घेत आपले शिक्षण पूर्ण करत आहेत .
कोरोना संकट काळात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या गरजू हुशार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी २०२० सालाप्रमाणे याही वर्षी २०२१ साली उमेद शिष्यवृत्ती जाहीर करत आहोत.यासाठी२२ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.
बारावीनंतर व्यावसायिक व पदवी शिक्षण घेत असलेल्या गरजू हुशार मुलांनी उच्च शिक्षणासाठी या उमेद शिष्यवृत्ती चा लाभ घ्यावा असे आवाहन उमेद फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी केले आहे.
यामध्ये उमेद शिष्यवृत्ती,
कै. रामचंद्र कृष्णाजी खाडे शिष्यवृत्ती ,डाॅ विरेंद्र कानडीकर व सौ.मंजिरी कानडीकर शिष्यवृत्ती अशा १लाख ३० हजार रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार असून या शिष्यवृत्ती सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोनच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी राजेंद्र पाटील- 8888650077
सागर पेंडूरकर 9657162445
प्रदीप पाटील 9403875441, जे.डी.पाटील 8605703103 व मनोज गुंजाळ 9527164695 , सूर्यकांत चव्हाण 9022650725 ,नाना सारंग 7741049420 ,जाकीर शेख 9421558328 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.