You are currently viewing राज्याच्या शिक्षणमंत्री यांना कोरोना संसर्ग. . .

राज्याच्या शिक्षणमंत्री यांना कोरोना संसर्ग. . .

मुंबई  :

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या.’
कृषी विधेयकांना विरोध करताना गदारोळ केल्याप्रकरणी काँग्रेसचे निलंबित खासदार राजीव सातव यांनी वर्षा गायकवाड यांना लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना झाल्याचे समजले. वर्षा ताई ठणठणीत बऱ्या होऊन तुम्ही लवकरच पुन्हा कार्यरत व्हाल याची मला खात्री आहे. आम्हा सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत.’
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘वर्षाताई गायकवाड आपण काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा. आपण धारावीमध्ये केलेले कार्य संपूर्ण जगाने पाहिले आहे. आपण लवकरच बरे होऊन पुन्हा जोमाने कार्यरत व्हाल हा विश्वास आहे.’ ‘वर्षाताई, आपण कोरोनामध्ये धारावीत केलेले कार्य संपूर्ण जगाने अनुभवले आहे. आपल्या सारख्या नेत्याचा समाजाने नेहमी सन्मान केला आहे. आपणास कोरोनाची लागण झाल्याचे कळाले. आपण लवकर बरे व्हा. काळजी घ्या,’ अशा शुभेच्छा काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =